सुधीर काळे
Sunday, April 03, 2011 AT 01:57 PM (IST)
Tags: pailteer, sachin tendulkar, sudhir kale, cricket
परवा आणखी एका संस्थळावरील एका सभासदाच्या लेखातील मॅच पहाताना "करायच्या-न करायच्या" गोष्टींमुळे होणार्या शकुन-अपशकुनाबद्दलचे उल्लेख वाचून गंमत वाटली आणि हा लेख लिहायची स्फूर्ती झाली. (अर्थात सचिन खेळत असताना "करायच्या-न करायच्या" गोष्टींची माझीही यादी आहेच!)
एक (गैर)समज असा आहे (किंवा सचिनच्या हितशत्रूंनी तो रचला आहे) कीं त्याने शतकी खेळी केली कीं भारत तो सामना हरतो.
सध्या जोरात सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेतसुद्धा सचिनने दोन शतके ठोकली-एक इंग्लंडविरुद्ध व एक दक्षिण आफ्रिकेविरुद्ध! पहिल्या सामन्यात धावांची बरोबरी झाली तर दुसर्यात दक्षिण आफ्रिकेऐवजी आपणच 'गुदमरलो' आणि २९ धावांत ९ बळी देऊन विजयाच्या जबड्यातून पराजयाला खेचून आणले! तसे पहिले तर सचिन तर वारंवार शतकी खेळी करतो, मग आपण सगळे सामने धडाधड हरतो की काय? आकडे काय बोलतात याबद्दल?
नुकताच 'क्रिकबझ्' या संस्थळावर नेमक्या याच विषयावर एक मस्त लेख प्रसिद्ध झाला. लेखक आहेत गोकुळ गोपाळ. त्यांनी दिलेली आकडेवारी आणखीच काही सांगून जाते. सध्या विश्वचषक स्पर्धेचा हंगाम असल्याने त्यांनी या लेखात फक्त एकदिवशीय सामन्यांचाच विचार केलेला असावा. पण आमचे 'आनंदजी डोसां' (माझे सहकारी श्री नाफडे) यांच्याकडे कसोटीची आकडेवारीही आहे. पणे तिकडे हा हंगाम झाल्यानंतर वळू.
सचिनचे हितशत्रू साधारणपणे 'सचिनने शतक = भारताची हार' असे वाक्य समीकरणच असल्याच्या आविर्भावात 'सोडून' देतात! पण आकडे काही दुसरीच हकीगत सांगतात! सचिनच्या एकूण ४८ एकदिवशीय सामन्यांतील शतकात फक्त तेरा वेळा भारत हरला आहे. तर चक्क ३३ वेळा त्याला विजय प्राप्त झाला आहे. २००२ मध्ये झालेल्या एका सामन्याचा निकाल लागला नाहीं तर अलीकडचा इंग्लंडबरोबरचा सामना बरोबरीत संपला. म्हणजे विजय-पराजयाचे प्रमाण जवळ जवळ ३:१ किंवा अगदी समीकरणाच्या भाषेत सांगायचे तर भारताचे विजय = ३(भारताची हार)!

(४८व्या 'एकदिवशीय' शतकानंतर प्रेक्षकांना अभिवादन करताना सचिन)
========================================
सचिनने शतक केले तरी भारत हरला असे सामने
धावा***धावगती***विरुद्ध***मैदान***कधी?
१३७***१००***लंका***दिल्ली***मार्च ९६ *१
१००***९०***पाक***सिंगा.***एप्रि ९६ *२
११०***८०***लंका***कोलंबो***ऑग ९६ *३
१४३***१०९***ऑस्ट्रे.***शारजा***एप्रि ९८ *४
१०१***७२***लंका***शारजा***ऑक्ट ०० *५
१४६***९५***झिंबा.***जोध.***डिसें ०० *६
१०१***७८***द. आ.***जो.बर्ग***ऑक्टो०१ *७
१४१***१०४***पाक***रा.पिंडी***मार्च ०४ *८
१२३***९५***पाक***अहमदा.***एप्रि ०५ *९
१००***८८***पाक***पेशावर***फेब्रु. ०६ *१०
१४१***९५***विंडीज***क्वाला***सप्टे. ०६ *११ (Not out)
१७५***१२४***ऑस्ट्रे***हैद्राबाद***नोव्हें ०९ *१२
१११***१०१***द.आ.***नागपूर***मार्च ११ *१३
या १३ पराजयांतल्या शतकांखेरीजच्या उर्वरित ३५ शतकांत भारताने ३३ सामने जिंकले, एक अनिर्णित राहिला व एकात बरोबरी झाली हे आपण वर पाहिले आहेच.
आता या १३ सामन्यांत इतर फलंदाजांच्या 'पराक्रमा"कडे एक नजर टाकू!
*१: या श्रीलंकेविरुद्धच्या ९६च्या विश्वचषक स्पर्धेतील 'लीग' सामन्यात भारताच्या ५० षटकांतल्या २७१ धावांत सचिनने १००च्या धावगतीने १३७ चेंडूंत १३७ धावा काढल्या होत्या. फक्त अझरुद्दीनने अर्धशतक केले. श्रीलंकेने आपल्या धावसंख्येचा पाठलाग करीत ४९व्या षटकात २७२ धावा केल्या. या सामन्यावरील अनुभवावरून अझरुद्दीनने नाणेफेक जिंकूनही क्षेत्ररक्षण निवडल्याचा उल्लेख माझ्या 'पूर्वीच्या विश्वचषक स्पर्धेतील कडू-गोड आठवणी-४: ईडन गार्डन्सला झालेले भारताचे पानीपत!' या लेखात आला आहेच.
*२ पाकिस्तानविरुद्ध सिंगापूरला झालेल्या एप्रिल ९६च्या या सामन्यात भारताचे सर्व फलंदाज ४८व्या षटकांत २२६ धावांत गारद झाले त्यात सचिन बाद झाला त्यावेळी भारताची धावसंख्या होती १८६/४. त्यानंतरच्या पराक्रमींनी मिळून ३८ धावा केल्या यात आश्चर्य ते काय? कारण त्यात ३ खेळाडू 'मॅच-फिक्सिंग'वाले होते.
*३ श्रीलंकेविरुद्धच्या ऑगस्ट ९६च्या या सामन्यात भारताच्या एकूण २२६-५ धावांपैकी सचिनने ८०च्या धावगतीने (त्याच्या नेहमीच्या मानाने अंमळ मंदगतीने) १३८ चेंडूंत ११० धावा केल्या. फक्त अझरुद्दीनने ९९ चेंडूत ५८ धावा काढल्या होत्या (धावगती ५९). शिवाय गोलंदाजीतही सचिनने ६ षटकात २९ धावा देऊन श्रीलंकेचा एकुलता एक बळी घेतला (श्रीलंकेने १ बळीच्या मोबदल्यात २२६ धावा केल्या होत्या.) श्रीनाथच्या गोलंदाजीनंतर 'काटकसरी' गोलंदाजीतही सचिन दुसरा होता.
*४ शारजाला झालेल्या या अविस्मरणीय 'लीग'मधील दिवस-रात्र सामन्यात प्रकाशझोतात खेळत सचिनने १३१ चेंडूत १४३ धावा केल्या. सचिन बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या होती ५ बाद २४२. ४३ षटके झाली होती. उरलेल्या ३ षटकात ३२ धावांचे लक्ष्य पार करताना भारताच्या इतर फलंदाजांनी फक्त ८ धावा केल्या (२५०-५)
*५ शारजाला २००० साली झालेल्या या सामन्यात भारताच्या २२४-८च्या धावांपैकी सचिनने ७२च्या धावगतीने १४० चेंडूंत १०१ धावा केल्या. इतर कुणीही अर्धशतकाचा पल्लाही ओलांडला नाही. श्रीलंकेने ४४व्या षटकात २२५-४ धाव करून सामना जिंकला. सचिनने ५ षटकात २२ धावा देत काटकसरी गोलंदाजीही केली. त्याच्यापेक्षा जास्त काटकसरी गोलंदाजी फक्त श्रीनाथची होती.
*६ डिसेंबर २००० साली झिंबाब्वेविरुद्ध जोधपूरला झालेल्या या सामन्यात भारताच्या २८३-८ या धावसंख्येत सचिनच्या १५५ चेंडूत १४६ धावा होत्या. तो बाद झाला त्यावेळी साडेसेहेचाळीस षटके झाली होती. उरलेल्या साडेतीन षटकांत आगरकर व झहीर या जोडीने ४८ धावा फटकारल्या. साडेसेहेचाळीस षटकांत सचिनने २३५ पैकी १४६ धावा केल्या होत्या. मग इतरांनी काय पराक्रम केला असेल ते लक्षात येईलच. सचिनच्या पाठोपाठ जास्तीत जास्त धावा केल्या होत्या झहीरने (३२). सचिनने ६ षटकांत ३५ धावा देत १ बळी घेतला. झिंबाब्वेने शेवटच्या षटकात २८४ धावा करत सामना जिंकला.
*७ द. आफ्रिकेविरुद्ध ऑक्टो २००१ च्या या सामन्यात भारताच्या २७९-५ च्या धावसंख्येत गांगुलीने १२६ चेंडूंत १२७ धावा केल्या होत्या तो बाद झाला तेव्हा धावसंख्या होती १९३-१. सचिन २६३च्या धावसंख्येवर ७८च्या धावगतीने १०१ धावा काढून सर्वात शेवटी बाद झाला. द. आफ्रिकेने २८० धावा करत हा सामना जिंकला.
*८ मार्च २००४ मध्ये रावळपिंडीला झालेल्या या सामन्यात भारत पाकिस्तानची ३२९ ची धावसंख्या ओलांडू पहात होता पण ४९व्या षटकात ३१७ धावांवर भारताचा डाव आटोपला. सचिनने १३५ चेंडूंत १४१ धावा केल्या व तो बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या होती ३८.४ षटकात २४५-४. ६८ चेंडूंत ८५ धावा करायचे हे आव्हान ६ फलंदाज हातात असूनही भारताला पेलले नाही. इतर कुणीही अर्धशतकही केले नाही!
*९ एप्रिल २००५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध अहमदाबादला झालेल्या ४८ षटकांच्या या सामन्यात भारताने ३१५-६ अशी धावसंख्या रचली. त्यात सचिनचा वाटा होता १३० चेंडूत १२३ धावा. त्यानंतरच्या दोन सर्वोच्च धावसंख्या होत्या ६४ चेंडूत ४७ धावा (धोनी) आणि अवांतर धावा ३९! पाकिस्तानने ४८ षटकांत ३१९ धावा केल्या. बालाजी, नेहरा आणि झहीर या तीन शीघ्रगती गोलंदाजांनी २६ षटकांत १८८ धावा दिल्या आणि केवळ २ बळी घेतले. सचिनच्या गोलंदाजीचे पृथःकरण होते ६-०-३६-१.
*१० फेब्रुवारी २००६मध्ये पेशावरला झालेल्या या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताच्या सर्व बाद ३२८ धावांपैकी सचिनने ११३ चेंडूंत १०० धावा केल्या. पठाण आणि धोनी यांनीही प्रत्येकी ६० धावा केल्या. ४५ षटकांनंतर सचिन ३०५-५ या धावसंख्येवर बाद झाला त्यानंतर इतरांनी ५ षटकात केवळ २३ धावा केल्या. सामना ४७ षटकांत संपवावा लागला व ३११-७ या धावसंख्येवर डकवर्थ-लुईस कायदा वापरून या अत्यंत चुरशीच्या सामन्यात पाक विजयी झाला.
*११ सप्टेंबर २००६मध्ये क्वालालंपूर येथे विंडीजविरुद्ध झालेल्या या सामन्यात भारताने ५० षटकांत ३०९-५ अशी धावसंख्या रचली. सचिन नाबाद राहिला, पण सचिनच्या १४९ चेंडूत १४१च्या डावानंतर फक्त पठाणचेच अर्धशतक होते, विंडीजला फक्त २० षटके मिळाली व त्यात १४१-२ अशा धावा करून डकवर्थ-लुईस कायद्यानुसार या अत्यंत चुरशीच्या सामन्यात विंडीज विजयी झाला.
*१२ नोव्हेंबर २००९मध्ये हैद्राबादला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात भारताला ३५१ धावा करायच्या होत्या. सचिनने केवळ १४१ चेंडूत १७५ धावा केल्या. भारत तीन धावांनी सामना हरला. सचिनखेरीज ५९ धावा करत फक्त रैना चांगला खेळला. बाकीच्यांनी चैन केली!
*१३ २०११च्या विश्चचषक स्पर्धेतील १२ मार्चला झालेल्या या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात सचिनने १०१ चेंडूंत १११ धावा काढल्या. तो बाद झाला त्यावेळी १ बाद २६७ या धावसंख्येवर सचिन बाद झाला. त्यानंतरच्या फलंदाजांनी फक्त २९ धावा केल्या व भारताची धावसंख्या झाली सर्व बाद २९६! दक्षिण आफ्रिकेने नेहराच्या शेवटच्या षटकात चार चेंडूत १४ धावा फटकावत आपली धावसंख्या पार करून सामना जिंकला!
सचिनच्या शतकी खेळीने भारताला पराजयापेक्षा विजयच जास्त मिळवून दिले आहेत हेच वरील आकडेवारीवरून स्पष्ट होते. आता सचिनने अर्धशतक साजरे केलेल्या पण शतकापर्यंत न पोचलेल्या खेळींत काय झाले ते पाहू.
आजपर्यंत सचिनने ९३ वेळा सचिनने अर्धशतक साजरे केले आहे त्यापैकी ५६ वेळा भारताला विजय मिळाला असून ३५ वेळा त्याचा पराजय झालेला आहे. दोन सामन्यांत निकाल लागू शकला नव्हता. याहून अधिक खोलात जाऊन अभ्यास केल्यास त्याने ७० ते ९९ धावा काढलेल्या खेळीत २८ वेळी भारत जिंकला आहे असे लक्षात येईल.
आता इतर शतकवीरांबरोबर सचिनच्या शतकांची तुलना आणि किती फलंदाजांच्या शतकी खेळींचे विजयात परिवर्तन झाले आहे हे पाहू. इथेही तेंडुलकर आपल्या टीकाकारांची तोंडे बंद करून टाकतो. कारण सगळ्यांत जास्त विजय मिळवून देणारा शतकवीरही सचिनच आहे. खाली जी यादी दिलेली आहे ती आहे विजय किती वेळा मिळविला आणि किती शतके केली याची! शिवाय आपला संघाला विजयी करून खेळीत जास्तीत जास्त वेळा नाबाद राहिलेला फलंदाजही सचिनच आहे!
फलंदाज***देश***शतके***नाबाद***सर्वोच्च
सचिन***भारत***३३***१३***२००*
जयसूर्या***लंका***२४***५***१८९
पॉंटिंग***ऑस्ट्रे***२५***८***१४५
सौरव***भारत***१८***१०***१८३
लारा***विंडीज***१६***३***१६९
गिलख्रिस्ट***ऑस्ट्रे***१६***१***१७२
डे. हेन्स***विंडीज***१६***१०***१५२*
सईद***पाक***१६***६***१९४
मार्क वॉ***ऑस्ट्रे***१५***४***१७३
ह. गिब्ज***द. आ.***१५***१***१७५
सचिनची १४ शतके दुसर्या डावात प्रतिस्पर्ध्यांची धावसंख्या ओलांडताना केलेली आहेत. आता त्याच्या तुलनेत इतरांची कामगिरी पाहू.
फलंदाज***देश***शतके
सचिन***भारत***१४
पॉंटिंग***ऑस्ट्रे***८
लारा***विंडीज***७
इंझमाम***पाक***३
रिचर्ड्स***विंडीज***३
द्रविड***भारत***२
वरील पराक्रमाबरोबरच एकदिवशीय सामन्यांत सचिनने सामनावीराचा आणि स्पर्धावीराचा सन्मान इतर कुणाहीपेक्षा जास्त वेळा मिळविलेला आहे.
या सर्व आकडेवारीवरून भारताच्या विजयात तेंडुलकरचा असामान्य हिस्सा होता हेच सिद्ध होते. भारताच्या विजयाचा तो नेहमीच एक मोठा शिल्पकार ठरलेला आहे.
त्याचे टीकाकार कांहींही म्हणोत, पण भारताच्या आणि एकंदरच क्रिकेटच्या खेळाच्या संदर्भात पहायचे झाल्यास सचिनचे योगदान अतीशय उच्च प्रतीचे आहे यात शंका नाहीं. आपल्या झंझावाती खेळाने सचिनने भारतीयांना क्वचितच मनस्ताप दिला असेल. जास्तीत जास्त वेळा त्याने भारतीय प्रेक्षकांना आनंद मिळवून दिला आहे. परवाच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातही हेच पुन्हा दिसून आले. तो बाद झाल्यावर बाकीचे 'भले-भले शिपाई ढळाढळा रडले' हेच आपण पाहिले! पण असल्या भल्या-भल्या शिपायांच्या अपयशाचे खापर सचिनच्या डोक्यावर का फोडायचे?
हा लेख मी उपांत्य आणि अंतिम सामन्यांपूर्वी लिहिला होता. हे दोन्ही सामने जिंकून भारत विश्वविजेता झाला आहे. या दोन्ही सामन्यात दुर्दैवाने सचिनचे शतक झाले नाहीं. या घटनेचा संदर्भ घेऊन पुन्हा असलेच (गैर)समज पसरणार नाहींत अशी मी आशा करतो!
"ऋणनिर्देश: या लेखासाठी माहिती पुरविल्याबद्दल श्री. नाफडे व श्री. धोंगडे यांचे आभार! "
===================================
प्रतिक्रिया
On 15/05/2011 05:37 AM parri said:
सचिन जेवा खेळतो तेवा कोणी खेळत नाही कारण ,कोणाला जमत नाही तें वालेस खेळायला ,म्हणून आपण हरतो,,,,,,,,सचिन अल्वेस बेस्ट हेय ,,,,,,,,,,,,,,,जेय्वा रेतायेर्द होएल ना तो तेय वळस कलन सर्न्वाना ,सचिन केय होता इंडिअन क्रिकेट team साठी ,,,,,,,
On 26-04-2011 08:24 ?.??. Mahesh Shetti said:
मच हरल्यावर आपण युवराजमुले हरलो किंवा पठाणमुले हरलो असे म्हणतो का? यातच सचिनचे मोठेपण दिसते.
On 19/04/2011 10:00 AM Rocky@rediffmail.com said:
अरे रे T20 मध्ये पण असे होईल वाटले नव्हते. कारणे खूप सिम्पल आहेत. सचिन शतक बनवतो आणि आपण हरतो त्याची. सचिन महान आहे ह्यात वाद नाही पण.. सचिन सर खेळतात आणि १०० मारायला ( ९० -पासून १०० पर्यंत जाण्या साठी ) खूप वेळ घेतात. त्यामुळे जे बोल वाया जातात तिकडेच आपण हरतो . आणि सचिन आपले शतक झाले कि टीम जीक्न्या साठी प्रयत्न करत नाही ते काम तो बाकीच्या वर सोडतो आणि तिकडेच आपण हरतो
On 13/04/2011 02:51 PM Dinesh said:
शुद्ध बावळटपणा आहे... अशी बालिश विधाने करणाऱ्या लोकांना चाबकाने फोडून काढायला पाहिजे. विघ्नसंतोषी असतात काही.. काय करणार.
On 13/04/2011 01:34 PM niteen more said:
Whos that nonsense spreading this superstitions? No one has a right to talk such a things about SACHIN!
On 13/04/2011 11:02 AM suyash shelke said:
सचिन is best
On 11/04/2011 04:55 PM शैलेंद्र said:
एवढ्या आकडेवारीची काहीच गरज नव्हती. जर भारत हरला तर त्या मागे बरीच करणे असू शकतात . आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे "शतक" (कुणाचेही) हे पराभवाचे कारण असूच शकत नाही. शतकामुळे भारत हरला हे किती illogical statement आहे!
On 11/04/2011 01:57 PM santosh said:
जर क्रिकेट सांघिक खेळ आहे तर अपयशाचे खापर फक्त एकट्या सचिन च्या माथी का ???
On 11/04/2011 01:32 PM sunil vaidya said:
sachin 100 = india loss. this statement is idiotic no doubt. but the statement sachin failure = india loss is equally idiotic. sachin is over credited and over hypped. sachin gives his 10 % and it is glorified as 100 % or even 1000 %. others give their 10 % and it is abused as 0 % or even -100 %. sachin given credit 100 % (single-handed (?)) for india win other players 0 % for india win. sachin given credit (or rather blame) 0 % other 10 players given credit (or rather blame) 100% for india loss
On 11/04/2011 11:59 AM dgp said:
हो अगदी बरोबर आहे. त्याचे शतक झाले नाही तर आपण जिंकतो. आणि दुसरे म्हणजे त्यने झेंडा कसा धरला होता? यौराराज ने तर झेद्याने तोंड पुसले हे सर्वेने फाहिले. हे दृश्ये सहन न होणारे आहे.
On 11/04/2011 09:58 AM vikas pathare said:
आपण देवाला हि नावे ठेवतो तर हा क्रिकेटचा देव कसा यातून सुटू शकेल ?
On 10/04/2011 06:44 AM c d joshi said:
कृपया २००३ ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत म्याच पहा , तसेच २०११ श्रीलंका विरुध्द भारत म्याच या मध्ये काय सेम आहे ? तर आपल्या सुरवातीच्या फलंदाजांची हाराकारी , हि म्याच गेली होतीच , जर हरलो आसतो तर सचिन च्या इनिंग वर प्रश्नचिन्ह होते ! आता नवीन लोक शोधा, एक तरी मराठी खेळाडू वर येऊ द्या ! नाही तर भारताची टीम आहे पण त्यात 'तात्या' लोक नाही !
On 09/04/2011 07:13 PM santosh said:
सचिन वर टीका करणे म्हणजे साक्षात परमेश्वरालाच दुषणे देण्यासारखे आहे. सचिन वर टीका करणाऱ्यांना देव सदबुद्धी देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. बाकी लेख खूप माहितीपूर्ण आणि सविस्तर लिहिला आहे. अभिनंदन!
On 09/04/2011 02:06 PM sanjay said:
fantastic
On 09/04/2011 12:29 PM Rajesh said:
Dear Sudhir, thanks for al this information. Can you also provide following information? - Out of matches when Sachin scored centuries & India won, how many of those centuries were against likes of Zimbabwe, Bangladesh & how many were against Aus, SA, Pak? - You need to get your basic mathematics clear, in the winning %ge, Desmond Hayens, Saurav Ganguli are much ahead of Sachin. Saeed Anwar is almost near to Sachin. So you statement that Sachin's centuries have highest winning %ge is wrong.
On 09/04/2011 10:02 AM santosh said:
सचिन हा क्रिकेटचा महाराजा आहे. सचिनचे विरोधी कितीही वाईट विचार केला तरी सचिन हा क्रिकेटचा चाहता आहे. क्रिकेट हे त्याच्या साठी सर्व काही आहे बाकी सर्व काही सगळ्यांनाच माहित आहे कि सचिन आहे तरच भारतीय टीम आहे
On 08/04/2011 10:43 PM Choukar! said:
सचिन च्या सगळ्या धावा रद्द करा! मग भारताचा धावफलक किती केविलवाणा दिसतो ते बघा! बाकीचे खेळाडू फक्त नांग्या टाकतात. सचिन हा सर्व कालीन अष्ट पैलू खेळाडू आहे. bradman सुद्धा पेंड खाईल त्याच्या पुढे.
On 08/04/2011 07:37 PM vijay said:
सचिनच्या शतकानंतर भारत हरतो कधीतरी.पण ज्या लोकांना फक्त नावेच ठेवायची असतात त्यांना हा प्रसंग म्हणजे शिमगाच.एक गोष्ट मात्र नक्की कि अशा लोकांना भारत का हरला हे महत्वाचे नसते तर सचिनने शतक केले म्हणून भारत हरला हे महत्वाचे.माज्या दृष्टीने असे लोक म्हणजे मूर्ख लोकांचे नेते असतील.काहीही झाले तरी सचिनची किंमत आणि अभिमान प्रत्तेक भारतीयाला आहे.ज्या धोनीने सचिनच्या २०० धावा होत असताना सचिनला strike देण्यासाठी उशीर केला त्याला सचिन सर्वश्रेष्ठ कॅप्टन म्हणतो.यातच त्याचा मोठेपणा दिसतो.
On 08/04/2011 02:25 PM shailesh said:
स्तुती करावी कि, पण जरा भान ठेवावे, जे आपल्या म्हणजे भारतीयाच्या रक्तात नाही. सचिन हा थोर फलंदाज आहे पण देव नाही. असे म्हणून आपण त्याचे कर्तुत्व कमी करतो हे लक्षात येत नाही. परंतु २००३ नंतर जेवा कधी गरज आहे तेंवा अपवादानेच सचिन सामना जिंकू किवा वाचू शकला आहे. हे सत्य आहे. त्याच्या सारख्या फलंदाजाने अनेक सामने एक हाती काढले पाहिजेत. तसे होत नाही. डोळे उघडले कि लक्षात येईल. अगदी पर्वाचा अंतिम सामना हि बघावा.
On 08/04/2011 02:00 PM Rocky said:
कोणी जर १०० कडून संघ जिंकत नसेल तर काय म्हणावे ... सचिन चांगला खेळाडू आहे ह्यात वाद नाही पण तो सांघिक खेळ करत नाही. संघ जीक्ने हरणे सचिन ला फरक पडत नाही. त्याचे असे म्हणणे दिसते कि माझा रेकॉर्ड झाला माझे काम झाले. ज्या ज्या वेळी हरलो आहे त्यावेळी तुम्हीच बघा. कोणी असे म्हटलेले ऐककेले आहे का कि सचिन आहे आपण मच जिंकू.तेच लारा,संघकारा,पोन्तिंग असताना कोणी असेल तर... सचिन असेल तर आपण अजून खाली कोण आहे बघतो. का कारण माहित आहे सचिन १०० काडणार आणि जिंकायच्या रन खालच्याला कडव्या लागणार.
On 07/04/2011 12:46 PM Ranjit Shitole said:
सचिन इस बेस्ट क्रिकेटर आहे आणि तो क्रिकेट विश्वाचा बाप आहे त्यला नावे ठेवणारी मूर्ख माणसे आहेत
On 07/04/2011 12:04 PM parag patil said:
this is just amazing stat event though i know all this but this the best compilation .. Sachin's critics will be shattered after reading this........ thanks Mr.Sudhir... May Sachin GOD bless u..
On 07/04/2011 11:01 AM Jayashri said:
आपण एका महत्वाच्या चुकीच्या गैर समाजाला दूर करण्याचा प्रयत्न केलात .....खूप चं....छान.....go on .......All the Best... After all he is MASTER BLASTER.........
On 07/04/2011 10:49 AM Prasad said:
शेवटी हि सांघिक कामगिरी असते, सचिन ने त्याचा वाटा योग्य रीतीने उचलेला असतो. त्यामुळे ज्या म्याचेस आपण हरलो त्या सांघिक भावनेच्या अभावामुळे हरलो असू. त्यात सचिन च्या शतकांचा काही दोष नाही. याचबरोबर लोकांनी विश्वचषक हा आपल्या देशाला मिळाला आहे कुणा एका व्यक्ती साठी तो मिळवला नाही हि राष्ट्रीय भावना जपावी. याने सचिनला देखील आनंदच होईल.
On 07-04-2011 06:04 ?.??. sandep said:
बाकीचे खेळाडूही खेळले पाहिजे शतकाचा आणि माच्च्या हरण्या जिंकण्याचा काही संबंध नाही
On 06/04/2011 08:20 PM avinash said:
सचिनवर टीका करणे म्हणजे मूर्खपणाच आहे . ज्या लोकांना bat सरळ धरायची कि उलटी तेच समाजात नाही , तेच लोक टीका करायला पुढे असतात .
On 06-04-2011 06:27 PM दिनेश said:
श्री सुधीर काळे, सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून साचेबद्ध पद्धतीने मांडल्याबद्दल आपले आभार. देवाला कोणी कितीही नावे ठेवली तरी फार काही फरक पडत नाही. ह्या (कृतघ्न) लोकांना फक्त तोंड चालवता येत आणि काही करायची वेळ आली कि पृष्ठभाग दाखवून पळ काढता येतो पण स्वतः पुढे येऊन एखाद्याबद्दल चांगले बोलायची यांची स्वतःचीच कुवत नाहीये. सचिन हा सर्व प्रकारच्या क्रिकेट format मधला अद्वितीय, अप्रतिम आणि न भूतो न भविष्यति व संपूर्ण भारताला ज्याची शान वाटावी असा अमूल्य हिरा आहे.
On 06/04/2011 01:57 PM सचिन , सावरगाव (निफाड) said:
आपण देवाला हि नावे ठेवतो तर हा क्रिकेटचा देव कसा यातून सुटू शकेल ?
On 06/04/2011 12:37 PM naresh said:
चालायचेच! काय आहे जशे लोक तसे विचार! लोकांचे तोंड आपण काही बंद करू शकत नाही. त्याची (सचिन ची) रन काढण्याची भूक वाढतच आहे ना. मग कशाला कोणाला पण भाव द्याचा.
On 06/04/2011 12:04 PM Vishal ek Sachin Bhakt said:
सचिनबद्दल काहीपण टीका करणारांच्या बुद्धीची मला खूप कीव येते . सचिन महान आहे ........ ... इति विशाल एक सचिन भक्त .....
On 06/04/2011 10:39 AM kegade said:
सचिन चे शतक = भारताचा पराभव असे म्हणणारे खरच मूर्ख आहेत, काही जणांना सवय असते उकलली जीभ लावली टाळ्याला ते काय बोलतात त्याचे त्याना माहित नसते.
On 06/04/2011 09:37 AM sonali said:
mla ase vatate ke kharach sachin jr changla khelala nahi tr apanch jinkto ok......
On 06/04/2011 09:27 AM Rahul said:
साचीने चे 2011 world cup मध्ये 2nd highest run आहेत. ----------------------------------------------------------------- TM Dilshan (SL) :--500 SR.Tendulkar [Ind]:--464 K:Sangakkara [SL]:--437 IJL Trott [Eng]:--422 WU Tharnaga:--393 -----------------------------------------------------------------
On 06/04/2011 04:38 AM Neel said:
क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे ! त्यामुळे हा मुद्दाच बिनबुडाचा आहे ! संघाचा विजय हि काही एकट्या सचिन चीच जबाबदारी नव्हे ! इतर खेळाडूंचा हि त्यात हातभार नको का ? सांघिक कामगिरी चांगली झाली कि संघ विजयी होतो ! असली आकडे मोड करण्या पेक्षा खेळाचा आनंद घ्या !
On 05/04/2011 10:07 PM salil ghatpande said:
सचिन चे शतक म्हणजे भारताचा पराजय हे त्रिवार सत्य आहे .
On 05/04/2011 09:10 PM Vikram said:
सचिन चे सहातक हे धावांचा पाठलाग करताना असेल तर भारत हरतो असं समीकरण आहे !
On 05/04/2011 08:43 PM page said:
लेखकाने नंतर का होयीना पण प्रामाणिकपणे माहीतच मुळ स्रोत सांगितला. चांगला लेख .
On 05/04/2011 08:43 PM Rajashree said:
लेख चांगला आहे. विचारपूर्वक लिहिलेला आहे. हे खरे आहे कि सरासरी ३:१ आहे पण लेखकांनी बाकी खेळाडूंची सरासरी पाहिली आहे का? e.g. Lara, Pointing. I am also proud of Sachin but facts are equally true.
On 05/04/2011 05:10 PM AVINASH TUNGE said:
सचिन हा महाराष्ट्रचा अभिमान आहे त्या च्या बद्दल बोलायची कोणाची हीमत झाली सचिन म्हणजे क्रिकेट चा देव आहे. तो फक्त टीम मध्ये असला तर पुढच्या टीम चे धाबे दणाणते.
On 05/04/2011 05:00 PM nitin baheti said:
फारच छान लेख! हाच लेख इंग्लिश मध्ये Time of India मध्येही लिहावा म्हणजे भारत भराच्या लोकाना कळेल. अर्थात सचिन तर batne टीकाकारांना उत्तर देतोच!
On 05/04/2011 04:48 PM प्रसाद said:
खूप छान लेख. सचिनच्या कर्तृत्वाबद्दल अज्ञानी असणाऱ्या लोकांनी एकदातरी वाचवा. त्यांचे अज्ञान दूर करण्यासाठी हे पुरेसे ठरावे. बाकी सचिन देवा तुझा महिमा अगाध आहे. अशा अज्ञानी लोकांना माफ कर. आणि त्यांना सद्बुद्धी दे.
On 05/04/2011 03:39 PM kale vaijayanti said:
हि अंध श्रद्धा आहे .तिला लॉजिक नसता .तुम्ही कितीही आकडेवारी द्या काही उपयोग नाही पण लेख छान आहे.
On 05/04/2011 11:35 AM Ganesh Jadhav said:
सचिन चे शतक म्हणजे भारत हरणार असे म्हणणारे खरच मूर्ख असतील...अरे मुर्खानो जर असे असते तर आता पर्यंत भारतीय टीम झिम्बोम्बे टीम सारखी झाली असती कोणी पण या आणि हरवून जा...अरे जरा अभिमान असू द्या मराठी असल्याचा!!!
On 05/04/2011 09:52 AM Sudhir Kale said:
श्री गोकुल गोपाल यांचा मूळ इंग्रजी (छोटा) लेख Cricbuzz या संस्थळावर पहायला मिळेल. जास्तीची आकडेवारी श्री. धोंगडे यांच्याकडून मला मिळाली आहे.
On 05/04/2011 09:40 AM हेरंब फडके, पुणे said:
"सकाळ" हल्ली इ-मेल वरचे साहित्य, बातमी म्हणून वापरते.... :-)
On 05/04/2011 06:51 AM काकडे धर्मराज तानाजी said:
छान लेख.
On 05/04/2011 12:52 AM makya said:
ज्यांना हा लेख अ मराठी लोकांना दाखवायचा आहे त्यांच्यासाठी आणि कृपया हे तरी पोस्त करा इ सकाळ वर http://www.cricbuzz.com/cricket-news/38170/the-myth-about-sachin-ton-and-india-losing
On 05/04/2011 12:43 AM Prashant said:
मला एक काळात नाही कि या लेखातील तक्ते "Table " वापरून का दिले नाहीत . वाचायला फार त्रास होतो.
On 04/04/2011 11:52 PM Amit said:
सुंदर लेख आणि सुंदर आकडेवारी. इसकाळ ने twitter आणि facebook च्या links द्याव्यात जेणेकरून आसे लेख share करता येतील. एक विनंती सुधीर काळे यांना, कृपा करून हा लेख इंग्लिशमध्ये प्रसिद्ध करावा किंवा मला परवानगी द्यावी.
On 04/04/2011 09:28 PM CricketVeda said:
खरच धन्यवाद. अतिशय माहितीपूर्ण लेख आहे हा. माझा पण बर्याच अलीकडे पर्यंत असाच गैरसमज होता कि सचिनचे शतक = भारताची हार. पण अलीकडेच मी Cricinfo वर वाचून माझे गैरसमज दूर केले. कृपा करून का लेख इंग्लिश मध्ये लिहून Cricinfo or TOi वर टाका आणि सचिन च्या नावावरच कलंक मिटू देत.
On 04/04/2011 08:00 PM Prashant said:
सुधीरजी तुमचे फार आभार, हा लेख खरच इंग्लिश मध्ये लिहा. भारत क्रिकेट वेडे राष्ट्र आहे पण खरच आपल्या कितवर लोकांना क्रिकेट कळते हा वादाचा मुद्दा आहे कारण लोकांना फक्त आकडे कळतात पण मैदानावरची जुगलबंदी कळत नाही. This is good information you shared for some idiotic mathematician.
On 04/04/2011 07:06 PM sachin's fan Nitin said:
सचिन बद्दल बोलण्याचा अधिकार फक्त सचिनलाच आहे. सचिन खरच खुप ग्रेट आहे, सचिनला जर क्रिकेटचा देव बोललो तरी ते अति होणार नाही.
On 04-04-2011 07:03 PM Ashwinee said:
फारच छान लेख! हाच लेख इंग्लिश मध्ये Time of India मध्येही लिहावा म्हणजे भारत भराच्या लोकाना कळेल. अर्थात सचिन तर batne टीकाकारांना उत्तर देतोच!
On 04/04/2011 06:38 PM Gajanan said:
अहो जे म्हणतात ना सचिनच्या शतकानंतर भारत हरतो त्यांच्याविषयी काही गोष्टी....... १.एक तर ते असे लोक असतात त्याना क्रिकेट मधील ज्ञान ० असत.. २.दुसरे म्हणतात म्हणून आपणही बोलायचं असे पण काही महाभाग असतात. ३.त्याना सचिनच महानपण बघवत नाही... ४.ते लोक नकारार्थी विचाराचे असतात. ५.त्याना सवयच असते काहीही घडले तरी दोष इतरांच देण्यात ते धन्यता मानता.. मी तर या लोकाना सांगतो कि अरे बाबांनो सचिन तर देव आहे.... तो क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट आहे...... सचिन तेंदुलकर कि ........जय हो.... !!गजानन(किरण)शिंदे!!
On 04/04/2011 06:26 PM Amit said:
मला सचिन चा खेळ अतिशय आवडतो... पण, जर २००४ नंतर च्या माचेस बघितल्या तर एक जाणवते, कि तिथे सचिन ने ११ शतक केली...त्यातले फक्त ४ सामने आपण जिंकलो.
On 04/04/2011 03:13 PM vikrant konde said:
सचिन खेळल्यामुले आपला पराभव किती कमी फरकाने होते हेहि जरा बघा
On 04/04/2011 02:40 PM Amogh said:
Too much of numbers झालंय या निबंधात.
On 04/04/2011 02:02 PM sagar patil said:
सचिन चे शतक = भारताचा पराभव , असा म्हणणार्यांना क्रिकेट चा ज्ञान नसत. त्यांनी आपल तोंड बंद ठेवाव हेच सत्य आहे
On 04/04/2011 01:33 PM Amit said:
कृपया चेक करा www.sachinandcritics.com सचिन विषयीचे सगळे गैर-समज दूर होतील.
On 04/04/2011 12:23 PM jaya said:
सचिन चे शतक = भारताचा पराभव , असा म्हणणार्यांना क्रिकेट चा ज्ञान नसत. त्यांनी आपल तोंड बंद ठेवाव
On 04/04/2011 09:40 AM satya said:
वा वा वा!!! काय सुंदर लेख आहे! एवढी सुंदर आकडेवारी देवून आपण आपल्या लाडक्या सचिनच्या टीकाकारांच्या अक्षरशः तोंडात मारली हो! कृपया हाच लेख इंग्लिश मध्ये Time of India मध्येही लिहावा म्हणजे भारत भराच्या लोकाना कळेल. सामना जिंकल्यावर विराट कोहली म्हणाला: गेली २१ वर्षे सचिन ने भारताचे (batting चे)ओझे वाहिले म्हणून आज आम्ही त्याला खांद्यावर मिरवून त्याचे ओझे वाहतो आहोत. सहकार्यांची अशी निष्ठा मिळवणे किती जणांना जमते?
On 04/04/2011 09:22 AM milind said:
काही लोकांना उगाच टीका करायचे असते..swataah खेळून बघा म्हणावे..मैदानाचा बाहेरून चर्चा करायला काय जाते..सचिन ने भारताला बर्याच वेळा जिंकून दिले आहे...त्याची उपस्थिती समोरचा संघाला धडकी भरवणारी असते हेच पुरे आहे...टीका करानी मर्यादित बुद्धीमत्तेचा अमर्यादित वापर करू नये....
On 04/04/2011 12:29 AM Manoj said:
क्रिकेट ने सुद्धा म्हणावे सचिन चा जन्म फक्त माझ्यासाठी आणि माझ्यासाठी चा................ सचिन is great on ground & more than that is off-field...................... no words as cricketer nothing as a man.............. simply bow to our god......................................
On 03/04/2011 10:09 PM Sagar said:
Sachin is Sachin.....everything else is simply baseless words...who ever blames Sachin, they should understand what they are.
On 03/04/2011 04:21 PM Sachin said:
वोव !!!! टीकाकारांनी हे जरूर वाचावे अन नंतरच टीका करावी.
On 03/04/2011 03:31 PM avantika said:
सचिनचे शतक झाले नाही आणि भारत जिंकला याची आकडेवारी बघा म्हणजे ठरवता येईल कोण बरोबर आणि कोण चूक ते.
On 03/04/2011 03:20 PM prashant said:
त्याच्या शतकाला सुरेख साथ कोणीच देत नाही. हेच तर दुखणे आहे. शतक झाल्यावर देखील हारतो म्हणजे तो सोडून बाकी सगळे आपयाशी ठरतात. संघाच्या विजयासाठी संघभावनेने खेळणे देखील महत्वाचे असते.
No comments:
Post a Comment